सावंतवाडी : जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागु केलेला असताना गैरकायदा जमाव करून तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांचा विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा कार्यालयाच्या दिशेने जात असताना श्रीराम वाचन मंदिर समोरील रस्त्यावर बंदोबस्तात असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी मनाई आदेश अवगत करूनही त्या ठिकाणी पालकमंत्री यांच्याविरुद्ध घोषणाबाजी, आरडाओरडा, हुल्लड करून दंगा केल्याबाबत आरोपी यांच्याविरूद्ध भा. दं. वि. कलम १४३, १४७, १८८ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) / १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. माजी खासदार निलेश राणे ,आमदार नितेश राणे यांसह ४१ जणांची निर्दोष मुक्तता सावंतवाडी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. आर. आर. बेडगकर यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केलीय. आरोपी तर्फे अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अॅड. गणेश प्रकाश चव्हाण, अॅड. अशोक गंगाराम जाधव यांनी काम पहिले.
यात सतिश जगन्नाथ सावंत रा. कणकवली, नितेश नारायण राणे, रा. कणकवली, निलेश नारायण राणे, रा. कणकवली, संदिप मुकुंद कुडतरकर रा. सालईवाडा, सावंतवाडी, मंदार गुरुनाथ नार्वेकर रा. उभाबाजार, सच्चिदानंद उर्फ संजू जगन्नाथ परच रा. सावंतवाडी, चंद्रकांत दत्ताराम गावडे रा. सालईवाडा, सावंतवाडी, सुधीर सुरेश आडीवरेकर, रा. जुनाबाजार, सावंतवाडी, दिलीप चंद्रकांत भालेकर, रा. गवळी तिठा, सावंतवाडी, संतोष चंद्रकांत जोईल. रा. खासकिलवाडा, सावंतवाडी, लक्ष्मण उर्फ संतोष सुभाष गांवस, रा. सालईवाडा, अमित बापु वेंगुर्लेकर, रा. खासकिलवाडा, सावंतवाडी, सत्यवान शिवराम बांदेकर, गौरांग नारायण रेगे, रा. सावंतवाडी सुरेश सखाराम कोलगावकर, रा. तळवडे, सावंतवाडी, सुमन दत्ताराम मुळीक, रा. मळेवाड, सावंतवाडी, मधुकर विठ्ठल नाईक, रा. कोलगाव, सावंतवाडी, डॉ. जयेंद्र श्रीपाद परुळेकर रा. सावंतवाडी, सौ. निकीता नारायण जाधव, रा. तळवडे, रा. सावंतवाडी, शंकर संभाजी साळगावकर, रा. तळवडे, सावंतवाडी, नितीन मुकुंद कुरतडकर, रा. फॉरेस्ट ऑफिस जवळ, सावंतवाडी, प्रमोद मोहन सावंत, रा. कुणकेरी, सावंतवाडी, विकास भालचंद्र सावंत, रा. सावंतवाडी, विक्रांत गोपीनाथ आजगावकर, रा. आजगाव, वेंगुर्ला, आनंद भास्कर शिरवलकर, रा. कुडाळ, रुपेश रविंद्र कानडे, रा. कुडाळ, रुपेश अनिल बिडये, रा. कुडाळ, शिवाजी गोविंद गवस, रा. दोडामार्ग, प्रकाश राजाराम सावंत, रा. दोडामार्ग, तुकाराम नारायण साळगावकर, रा. वेंगुर्ला, उभादांडा, विष्णुदास साजबा कुबल, रा. वेंगुर्ला, नवाबाग, निलेश जयप्रकाश चमणकर, रा. उभादांडा, वेंगुर्ला, प्रितेश शंकर राउळ रा. रेडी, वेंगुर्ला, विष्णु चंद्रकांत परब, रा. परबवाडा, वेंगुर्ला, वसंत महादेव तांडेल, रा. नवाबाग, वेंगुर्ला, भुषण भगवान सारंग, रा. विठ्ठलवाडी वेंगुर्ला, अशोक यशवंत वेंगुर्लेकर, रा. गावडेश्वर मंदिरजवळ, वेंगुर्ला, सुर्यकांत हरिश्चंद्र भालेकर, रा. खारेपाटण, कणकवली, गुरूनाथ रघुनाथ सावंत, रा. निमजगा, बांदा, जावेद हुसेन खतीब, रा. मुस्लिमवाडी, बांदा साईनाथ सोनुनाथ धारगळकर, रा. देऊळवाडा, बांदा यांची सावंतवाडी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. आर. आर. बेडगकर यांनी आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केलीय. आरोपी तर्फे अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अॅड. गणेश प्रकाश चव्हाण, व अॅड. अशोक गंगाराम जाधव यांनी काम पहिले.