
मुंबई : संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा मुंबईत होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वरळीत होणाऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 20 वर्षांनंतर एका व्यासपीठावर येणार आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तोफ वरळी डोममधून आज धडाडणार आहेत. मात्र कार्यकर्त्यांची अविश्वसनीय गर्दी पाहायला मिळाली.
मुंबईतील वरळी डोममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरळीत दाखल झाले आहेत. तसेच विविध मराठीप्रेमी देखील एनएससीआय डोममध्ये पोहचले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांआधी विविध राजकीय पक्षासोबत विविध साहित्यिक, कलाकार, शाळेतील शिक्षक, विविध मंडळे यांना मराठीसाठी सहभागी होण्याचे आवाहन केलं होतं. तसेच कोण कोण येत नाही, हेही बघतोच, असं विधानही राज ठाकरेंनी केलं होतं. त्यानंतर आज विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची हजेरी पाहायला मिळत आहे.
मात्र, सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी आता पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेलीय. अनेक कार्यकर्त्यांनी गेट तोडून प्रवेश केलाय.