राज ठाकरे आठ दिवसांच्या कोल्हापूर-कोकण दौऱ्यावर

२९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत आयोजन | पदधिकारी बैठका आणि भेटीगाठी यावर जोर
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 24, 2022 16:51 PM
views 424  views

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आठ दिवसांच्या कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची घोषणा करत माहिती देण्यात आली आहे. यानुसार राज ठाकरे २९ नोव्हेंबरला आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. हा दौरा ६ डिसेंबरपर्यंत चालेल.


मनसेने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “२९ नोव्हेंबर २०२२ ते ६ डिसेंबर २०२२ या दरम्यान राज ठाकरे कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर येत आहेत.”


राज ठाकरेंच्या दौऱ्याला मंगळवारी (२९ नोव्हेंबर) सुरुवात होईल. ते सर्वात आधी मुंबईहून कोल्हापूरला रवाना होतील. त्यानंतर ते तेथून सावंतवाडीला जातील. राज ठाकरेंचा हा दौरा ६ डिसेंबरला दिपोलीत संपणार आहे.

सविस्तर दौरा असा..