कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून तसेच अशोक स्तंभाच्या जागी त्यांचा फोटो एडिट करून संविधानाचा अपमान केल्याबद्दल तात्काळ सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन कुडाळ 'भाजयुमो'ने कुडाळ पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्याकडे दिलय.
निवेदनातील माहिती अशी : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे नेते आहेत. त्यांच्याबाबत फेसबुक व ट्विटरवर 27 रोजी कु. मेघना सडवेलकर ट्विटर कु.आयोध्या पोळ पाटील या दोघांनी मिळून आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. अशोक स्तंभाच्या जागी त्यांचा फोटो एडिट करून संविधानाचा अपमान केल्याबद्दल तात्काळ ह्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा.
यावेळी जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन तेंडुलकर, सरचिटणीस रुपेश बिडये, जिल्हा उपाध्यक्ष सुश्मित बांबूळकर, सोशल मीडिया युवा जिल्हा संयोजक राजवीर पाटील, युवा मोर्चाचे संदेश सुकळवाडकर, सोशल मीडिया तालुका संयोजक राम बांदेलकर, प्रसन्न गंगावणे आदी उपस्थित होते.