कोकणाला 'विष', गुजरातला 'मलई' : डॉ. परूळेकर

रिफायनरीबाबत सुरेश प्रभू गप्प का ? परूळेकर यांचा सवाल
Edited by: विनायक गांवस
Published on: April 28, 2023 13:05 PM
views 201  views

सावंतवाडी : कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात बारसु रिफायनरी संदर्भात रणकंदन माजलं आहे. कोकण आणि प्रदुषणकारी प्रकल्पाचा १५ वर्षांचा इतिहास आहे. अनेक प्रकल्प या कोकणावर लादले जात होते. माती परिक्षणाच्या नावाखाली सरकारकडून केली जाणारी दडपशाही निषेधार्ह आहे. इथले ग्रामस्थ, महिला नक्षलवादी आहेत का ? कोकणी लोकांनां सरकार दहशतवादी समजत का ? असा सवाल डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला. 


दरम्यान, हे आंदोलन कव्हर करण्यास पत्रकारांना सुद्धा विरोध केला गेला. महिला गांधी विचारानं शांतताप्रिय आंदोलन करत होत्या. उद्योग मंत्री उदय सामंत खोटं बोलतायत. रत्नागिरीचे एसपी महिलांशी बोलत होते ती पद्धत नव्हे. आंदोलन हा देशाचा आत्मा आहे. देशाला स्वातंत्र्य यातूनच मिळालं आहे. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. इंग्रज सरकारला लाजवेल, असं कृत्य सरकार करत आहे. उदय सामंत, नारायण राणे, दीपक केसरकर घटनास्थळी का गेले नाही. जनतेतून निवडून गेलेले हे लोकप्रतिनिधी आहेत‌. तर प्रकल्पाला ग्रीन नाव दिलं म्हणून तो ग्रीन होत नाही‌. पेट्रोकेमिकल प्रकल्पाला हरित प्रकल्पात टाकलं तर जगात लाज जाईल. कच्चा तेलाच्या शुध्दीकरणासाठी हा प्रकल्प असणार आहे. पक्क तेल पुन्हा परदेशातच जाणार आहे. टाटा एअर बस्ट, वेदांता सारखे प्रकल्प दोडामार्गात का नाही आणले ? वायनरी, पर्यटन प्रकल्प का नाही देत ? असा सवाल उबाठा गटाचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.

कोकणाला प्रकल्प हवेत पण, विष नकोय. दिल्लीत बसून पैसा कमावयला कुणी कोकणावर विषारी प्रकल्प लादत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. ऑटोमेशनमुळे १ लाख सोडा १० हजार लोकांना सुद्धा रोजगार मिळणार नाही, अशा रोजगाराच गाजर लोकप्रतिनिधी दाखवत आहेत असं डॉ. परूळेकर म्हणाले.