पद्मश्री डॉ. सुधा मूर्ती यांची बापर्डे ग्रामपंचायतला भेट ; आदर्शवत कामाचे कौतुक

बापर्डे गावानं स्वतची वेगळी ओळख निर्माण केली : डॉ, मूर्ती
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 09, 2022 12:21 PM
views 497  views

देवगड : प्रसिद्ध लेखिका पद्मश्री डॉक्टर सुधा मूर्ती यांनी 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये भाग घेतला होता आणि या शो मधून मिळालेली सर्व रक्कम बापर्डे कॉलेजच्या उभारणीसाठी या शिक्षण संस्थेत देणगी स्वरूपात दिली होती. बुधवार 9 नोंहेबर रोजी बापर्डे येथील नव्याने उभारण्यात आलेल्या कॉलेजचे उद्घाटन डॉ सुधा मूर्ती यांच्या हस्ते होत आहे. या उद्घाटनाच्या निमित्ताने पद्मश्री डॉ सुधा मूर्ती या बापर्डे गावात आल्या होत्या.  यावेळी त्यांनी बापर्डे ग्रामपंचायतिला भेट देत ग्रामपंचातीने राबविलेल्या विविध उपक्रमांची व पुरस्काराबाबत थोडक्यात माहिती सरपंच संजय लाड व ग्रामसेवक शिवराज राठोड यांच्याकडून जाणून घेतली.


डॉ.  सुहास राणे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी शैक्षणिक तसेच गावच्या समाजकामातही घेतं असलेल्या पुढाकारामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावची एक वेगळी ओळख देश, राज्यपातळीवर निर्माण करण्याचे काम या गावाने केले आहे. बापर्डे ग्रामपंचायत सरपंच संजय लाड व ग्रामसेवक शिवराज राठोड यांच्या कामाचेही विशेष कौतुक केले .


       यावेळी सरपंच संजय लाड, उपसरपंच रमेश देवळेकर, माजी जि, प, उपाध्यक्ष विठ्ठलराव नाईकधुरे, जि, प,सदस्य सौ.  अनघा राणे, ग्रामसेवक शिवराज राठोड, माजी सरपंच श्रीकांत नाईकधुरे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष नाईकधुरे,चेअरमन अजित राणे,ग्रामपंचायत सदस्य विश्वास नाईकधुरे, प्रियंका राणे, अतुल राणे,संदीप नाईकधुरे, जीवन नाईकधुरे, एम,बी, नाईकधुरे, ग्रामपंचायत कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते,