मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्यानंतर उमेदवारांकडून छुपा प्रचार केल्याचंही समोर आलं. यापूर्वी महायुतीनं उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी टीव्ही मालिकांमध्ये जाहिरातबाजी केल्याचं समोर आलं होतं. या विरोधात काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाकडं धाव घेतली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. या सगळ्या प्रकारावर आता एकनाथ शिंदे यांच्या गटाला २४ तासात म्हणणे मांडण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
निवडणूक आयोगाने घेतली गंभीर दखल ?
शिंदे गटाकडून छुपा प्रचार करण्यात आल्याच्या काँग्रेसच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदे गटाला येत्या २४ तासांत म्हणणं मांडण्याचा आदेश दिला आहे. यासंदर्भातलं पत्रकही जारी करण्यात आलं आहे.
सचिन सावंत काय म्हणाले ?
निवडणूक आयोगानंतर सचिन सावंत यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. असं असलं तरी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा, यात पैशांची देवाणघेवाण झाली असण्याची शक्यता आहे, असं ही त्यांनी म्हटलं.