एक कोटी कोणाच्या खिशातले ? उत्तर द्या !

नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 26, 2023 10:59 AM
views 368  views

ब्युरो न्यूज : रामलल्लाची मालकी यांच्याकडेच आहे अशा प्रकारे ते मत मागतात. श्री प्रभू रामाच्या मंदिरासाठी जर कोणी मोठे दान दिलं असेल तिथे शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी एक कोटी रुपये त्यावेळी दिले. त्या ठिकाणचा सातबारा हा रामाच्या नावावरती आहे.भाजपच्या नावावरती नाही, असं संजय राऊत म्हणाले.

राऊत यांनी केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिल आहे. राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत म्हणतात राम मंदिर ची काय भाजपची प्रॉपर्टी आहे का? सातबारावर काय भाजपचे नाव आहे क? अयोध्येत जिथे राममंदिर उभं राहतंय, त्याच्या सातबाऱ्यावर समस्त हिंदूंचे नाव आहे, असे नितेश राणे म्हणाले. राम मंदिरासाठी देणगी सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी दिली आहे. आम्ही ऐकलं आहे की ती देणगी एकनाथ शिंदे यांच्याकडून घेऊन दिलेली आहे. हे खरं आहे की खोटं आहे. 1 कोटी हे उद्धव ठाकरे यांचे आहेत की एकनाथ शिंदे यांच्या आहेत. याचे उत्तर आधी द्यावे मगच देणगी बाबत बोलावे असे राणे म्हणाले.तुझ्या सारखे चायनिस मॉडेल हिंदू ज्यांना रामाची आठवण फक्त निवडणुकीच्या निमित्ताने येते. 2019 ला मालकाची घोषणा आठवा. पहिले मंदिर फिर सरकार आणि आता मंदिराचे नाव घेतलं की त्याची 10 जनपखवर बसलेली मम्मी कसा कान कुरळेल हे मग कळेल, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

राम लल्लाच्या मंदिरासाठी जर कोणी मोठे दान दिलं असेल ते शिवसेनेने दिलं आहे. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी 1 कोटी रूपये त्यावेळी दिले. त्या ठिकाणचा सातबारा हा रामाच्या नावावरती आहे, भाजपच्या नावावरती नाह. रामल्लाची मालकी यांच्याकडेच आहे अशा प्रकारे ते मत मागतता. असे राऊत म्हणाले.फुटक दर्शन द्यायला रामलल्ला तुमची प्रॉपर्टी आहे का?, असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, हृदयात राम आणि हातात काम हे आमचं हिंदुत्व आहे. परंतु आता हिंदुत्वाचा आधार घेऊन हिंदुंच्या विरोधात तानाशाही आणण्याचा प्रयत्न होत आहे. या तानाशाहीला संपवून टाका. कारण महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला जात आहेत. देशात दुसरे राज्य नाहीत का? आपल्या सोबत असणारे गुजराती परत जाणार का? गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होणार, असं मोदी का म्हणतात? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही का?, असे सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.