सिंधुदुर्ग : भाजप नेते, आमदार नितेश राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना सरकारडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. भाजप नेते नितेश राणे हे लँड जिहाद, लव जिहादच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असतात. अशावेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आमदार नितेश राणेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून नितेश राणे हिंदुत्वाबद्दल आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. ते राज्यभर मोर्चे काढत आहेत. कार्यक्रम करुन या मग आम्हाला फोन करा. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे आम्ही तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. सुखरुप घरी सोडू, असे विधान नितेश राणे यांनी जाहीर सभेत केले होते. या विधानानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली होती.