सावंतवाडी : मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सव २०२३ मध्ये विभागीय स्तरावर सावंत वाडीचा सुपुत्र निरज मिलिंद भोसले याला इंडियन क्लासिकल तबला विभागामध्ये द्वितीय क्रमांक व सिंधुदुर्ग विभागातून हार्मोनियम वादक मंगेश रामचंद्र मेस्त्री याला इंडियन क्लासिकल स्वरवाद्यमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. मुंबई येथील अंतिम फेरीत विद्यापीठ स्तरावर दोघांनाही उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.
आपले गुरु सिद्धेश कुंटे यांच्या मार्गर्शनाखाली व किशोर सावंत, गुरूवर्य निलेश मेस्त्री यांच्या सहकार्यामुळे तबला स्वतंत्र वादन करण्याचा प्रयत्न करु शकलो. त्याच बरोबर नाट्यसंगीत, क्लासिकल व्होकल व लाईट व्होकल सारख्या काही इव्हेंटस मध्ये साथ संगत करण्याचा योग आला. जयेश रेगे, पं. सुधीर नायक, धनंजय पुराणिक, स्वीकार कट्टी, नरेंद्र कोथांबिकर, अतिंद्र सरवंडीकर, मुकुंद मराठे, विजय जाधव इत्यादी दिग्गज व्यक्तींसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळाली अशी भावना निरज भोसले यान व्यक्त केली.
सावंतावडीचे सुपुत्र असणाऱ्या तबलावादक निरज भोसले व हार्मोनियम वादक मंगेश मेस्त्री यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.