BIG BREAKING | 24 तासात निलेश राणेंची नाराजी दूर

Edited by: ब्युरो
Published on: October 25, 2023 13:15 PM
views 1089  views

मुंबई : माजी खासदार निलेश राणे यांनी तडकाफडकी राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर, मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदातून निलेश राणे यांनी सक्रीय राजकारण सोडल्याची चर्चा होती. त्यामुळे आज रवींद्र चव्हाण यांनी स्वत: निलेश राणे यांची त्यांच्या मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली. जवळपास दीड-दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.