सावंतवाडी : लव्ह जिहाद संबंधित नितेश राणे यांना विचारल असता कोल्हापूरात १८ दिवसांपासून ती तरूणी घरी भेटली नाही. पण, काल आमचं जन आंदोलन होताच काही तासांत ती मुलगी घरी कशी येते ? म्हणजे तीला संपर्क कसा करायचा हे काहींना ठाऊक होत. हे सगळे विषय आता थांबले पाहिजेत. राज्यात आता हिंदुत्ववादी विचारांच सरकार आलं आहे. कुठल्याही हिंदू बांधवांला टार्गेट केल तर त्याला सोडणार नाही असा इशारा नितेश राणेंनी सावंतवाडी इथं दिलाय.
ते म्हणाले, १८ दिवसापासून धर्मांतरासाठी आमच्या एका लहान भगिनीला तिच्या घरापासून बाहेर ठेवत गायब गेलं होतं. काल रात्री आठ-नऊच्या सुमारास त्या मुलाबरोबर ती कर्नाटकमध्ये सापडली असून ती परत घरी आली आहे. तीच मेडिकल करण्याच काम सुरू आहे. जेव्हा जेव्हा हिंदू समाज म्हणून आपण एकत्र येऊ तेव्हा अशे प्रकार थांबू शकतात, त्याला आपण आळा घालू शकतो. हाच एक संदेश कालच्या जन आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही दिलेला आहे. पोलिस खात्यात काही विशिष्ट अधिकारी आहेत जे अशा प्रकरणात संबंधितांना मदत करतात, १८ दिवसांपासून ती तरूणी घरी भेटली नाही. पण, कालच आंदोलन होताच काही तासांत ती मुलगी घरी कशी येते ? म्हणजे तीला संपर्क कसा करायचा हे काहींना ठाऊक होत. हे सगळे विषय आता थांबले पाहिजेत. राज्यात आता हिंदुत्ववादी विचारांच सरकार आलं आहे. कुठल्याही हिंदू बांधवांला टार्गेट केल तर त्याला सोडणार नाही अशी भूमिका सरकारची असल्याने भविष्याच्या दृष्टीने डिसेंबर मध्ये अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा अभ्यास या निमित्ताने सुरू आहे. लवकरच हा कायदा येईल तेव्हा धर्मांतराचे हे प्रश्न थांबतील. तर गृह खात्यातील काही अधिकाऱ्यांना वाटतय की महाविकास आघाडीच सरकार आहे. आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि ते वाचवतील, या विचारात असणाऱ्या अधिकाऱ्यांचे गैरसमज आम्ही लवकरच दूर करू. गृह खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या माध्यमातून पोलिस खात्यात स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. येणाऱ्या दिवसांत ते ही मोहीम राबतील असा विश्वास आहे असं मत राणेंनी व्यक्त केले.