आपण राजकारणातही हवेत आण‍ि... ; शरद पवारांच्या राजीनाम्यावर नारायण राणेंचं ट्विट

Edited by: जुईली पांगम
Published on: May 02, 2023 18:56 PM
views 540  views

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा आज पवार यांनी केली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली, या निर्णयावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही ट्विट करुन प्रतिक्रिया दिली. 

माननीय शरद पवार साहेब आपण राजकारणातही हवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदीसुद्धा हवेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.