महाराष्ट्र - गोव्यात भाजपचेच वर्चस्व असेल : नारायण राणे

Edited by: भरत केसरकर
Published on: May 09, 2024 07:37 AM
views 716  views

गोवा : महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त तर गोव्यातील दोन्हीच्या दोन्ही उमेदवार हे निवडून येतील असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गोवा येथे व्यक्त केला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

नुकतीच रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक झाली. महायुतीचे नारायण राणे उमेदवार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेले कित्येक दिवस प्रचाराचा धडाका सुरु होता. मतदानानंतर आता काहींसा आराम या सगळ्या नेतेमंडळींना मिळतोय. गोव्यातील एअरपोर्टवर जाण्याच्या अगोदर त्यांनी गोव्याचे CM प्रमोद सावंत यांची भेट घेतली. महाराष्ट्र गोव्यात भाजपच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग - गोव्याच्या वाळू प्रश्नावर पत्रकारांनी विचारले असता त्यावर बोलणं त्यांनी टाळले.