मुंबै बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी यांचा ठाकरे गटात प्रवेश

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 17, 2024 13:18 PM
views 478  views

मुंबई :  मुंबई बॅकेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान संचालक पुरुषोत्तम दळवी यांनी भाजपची साथ सोडत ठाकरे शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले.

श्री.दळवी हे प्रविण दरेकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. तसेच त्यांनी मुंबै बँकेच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला होता. त्यांच्या प्रवेशाने ठाकरे शिवसेनेची मुलुंड भागात ताकद वाढणार आहे.