
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सकाळी मुंबईहून नागपूरला रवाना होत असताना त्यांच्या विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे उड्डाण पुढे ढकलावे लागले. यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे ज्या खासगी विमानातून नागपूरला जाणार होते त्या विमानातून मुख्यमंत्री फडणवीस नागपूरकडे रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, आदिती तटकरे हे मंत्री उपस्थित होते.
विमानातील तांत्रिक बिघाड झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विमान बदलण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री नियोजित वेळेनुसार नागपुरात पोहोचल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.














