पिंपरी : चिंचवडमधील ताथवडे येथे जेएसपीएम विद्यालयाच्या परिसरात अचानक तीन ते चार स्कूल बसला आग लागल्याने मोठे स्फोट घडले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थी आणि नागरिक या स्फोटांच्या आवाजामुळे रस्त्यावर सैरावैरा धावत सुटले. धुरांचे लूट आणि ज्वाळा काही किलोमीटरवरून दिसत होत्या, याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.