सिंधुदुर्ग : नैऋत्य राजस्थानच्या काही भागांतून 25 सप्टेंबर, 2023 पासून मान्सूनने आपल्या परतीच्या प्रवासास सुरुवात केली आहे. नैऋत्य राजस्थानमधून मान्सून माघारी फिरण्याची सामान्य तारीख ही 17 सप्टेंबर असुन तब्बल 09 दिवसांनी उशिराने मान्सूनने आपल्या परतीच्या प्रवासास सुरुवात केली आहे, अशी माहिती ग्रामीण कृषी मौसम सेवा मुळदेच्यावतीने देण्यात आलीय.
नैऋत्य मोसमी पावसाची माघार खालील हवामान परिस्थितीवर आधारित :
1)सदर प्रदेशात 850 hPa पातळीवर अव-चक्रीवादळ (Anti-Cyclone) अभिसरण तयार झालेले आहे.
2) सदर प्रदेशात गेल्या ५ दिवसात पाऊस झालेला नाही.
3) पाण्याच्या बाष्पाची प्रतिमा या प्रदेशात कोरड्या हवामानाची स्थिती दर्शवते.
♦️नैऋत्य मान्सूनच्या माघारीची रेषा २८.३° उत्तर अक्षवृत्त/७२.०° पूर्व रेखावृत्त वरील नोखरा, जोधपूर, बारमेर, या शहरातून तसेच २५.७° उत्तर अक्षवृत्त /७०.३° पूर्व रेखावृत्ता मधून जाते.