'पाणीदार' आमदार ; अनिल बाबर यांचे निधन

Edited by: ब्युरो
Published on: January 31, 2024 11:03 AM
views 117  views

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खानापूर मतदारसंघांचे आमदार अनिल बाबर यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांना कफचा त्रास होत असल्याने सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

बाबर यांना कफचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. १९९० ते १९९५, १९९९ ते २००४ आणि २०१४ ते २०२४ असे चार वेळा ते आमदार राहिलेत. अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आता शिंदेंची शिवसेना असा राहिला आहे. त्यांनी खानापूर, आटपाडी, कवठेमंकाळ, जत इत्यादी दुष्काळी टापूत टेंभू योजनेचे पाणी पोहोचवले होते. त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली होती. बाबर यांच्या निधनाने सांगलीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.