
मुंबई : राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सपत्नीक गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी पत्नी ऋतुजा राणे, मुलगा निमिष यांच्या समवेत गणपती बाप्पाची आरती केली.
गणरायाचे दर्शन घेताना मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राला बळीराजाच्या मेहनतीचे योग्य फळ मिळो, माझ्या मच्छीमार बांधवांचे जीवन अधिक सुखी-समृद्ध होवो तसेच राज्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य व आयुष्य मंगलमय होवो, अशी बाप्पा चरणी प्रार्थना केली.