कणकवली : नितेश राणे हे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर 22 डिसेंबर रोजी पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान यांचे खारेपाटण ते दोडामार्ग पर्यंत ठीक ठीक आहे मोठा उत्साह जंगी स्वागत केले जाणार आहे.
खारेपाटण ते दोडामार्ग व्हाया देवगड
त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 9:30 वाजता ते खारेपाटण येथे येणार असून तेथे स्वागत होईल. नंतर पडेल देवगड मध्ये 11 वाजता भाजप कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात येईल. 11:30 देवगड भाजप कार्यालयात स्वागत येथे स्वागत करण्यात येईल ,12:30 तळेबाजार येथे स्वागत,1 वाजता शिरगाव बाजारपेठ बाजारपेठ येथे स्वागत, 1:30 नांदगाव बाजारपेठ मध्ये स्वागत समारंभ, त्यानंतर कुडाळ मधील सिंधुदुर्गनगरी येथे भाजप कार्यालयात दुपारी 2 वाजता स्वागत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत 3 वाजता स्वागत, त्यानंतर सावंतवाडी बांदा येथे 3:30 वाजता सत्कार सोहळा, त्यानंतर दोडामार्ग रवाना होतील तेथे 4:30 ला सत्कार सोहळा कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता कुडाळ येथे स्वागत समारंभ, त्यानंतर कणकवली येथे 7 :30 मिनिटांनी मंत्री नितेश राणे यांचा सत्कार सोहळा कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर होईल.
मंत्री झाल्यानंतर नितेश राणे यांचा पहिलाच जिल्हा दौरा असून त्यामध्ये सर्वच कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.