आमदार नितेश राणेंचं मंत्री चव्हाण आणि बावनकुळेंनी केलं विशेष कौतुक !

बांदा या एकमेव ग्रामपंचायतीनंतर राणेंनी भाजपकडे खेचल्या 80 टक्के ग्रामपंचायती
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 22, 2022 10:55 AM
views 665  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 325 पैकी तब्बल 250 हून अधिक ग्रामपंचायती जिंकून आमदार नितेश राणे भाजपच्या विजयाचे खरे किंगमेकर ठरले. जिल्ह्यात प्रथमच मोठा विजय मिळवून दिल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नागपूर अधिवेशादरम्यान आमदार नितेश राणे यांचे विशेष कौतुक केलं. आमदार राणे भाजपमध्ये येण्यापूर्वी जिल्ह्यात फक्त बांदा ही एकच ग्रामपंचायत भाजपकडे होती. मात्र, राणे पिता पुत्र भाजपमध्ये आल्यावर जिल्ह्यातील ८० टक्के ग्रामपंचायती ह्या भाजपकडे आल्या आहेत. विरोधकांकडून नेहमीच राणे पिता पुत्रांना लक्ष्य केलं जातं. मात्र, विरोधकांच्या टीकेला राणे पिता पुत्रांनी कृतीतून उत्तर दिलंय. त्यामुळे भाजपच्या राज्यस्तरावरील नेतेमंडळीकडून राणे पुत्रांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक होत आहे.