सिंधुदुर्ग : प्रत्येक वर्षी २५ डिसेंबरला येशू ख्रिस्ताच्या वाढदिवशी 'ख्रिसमस' साजरा केला जातो. येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथलेहेम शहरात झाला. त्याच्या आईचे नाव मरीया आणि वडिलांचे नाव योसेफ होते. या दिवशी, ख्रिश्चनांचा प्रभु मानल्या जाणार्या येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली जाते आणि चर्च सजवल्या जातात. विविध समारंभांचे आयोजन देखील केले जाते. नाताळ हा शब्द लॅटिन भाषेचा नातूय या शब्दापासून तयार झालेला असून त्याच्या अर्थ जन्म असा होतो. इंग्रजी भाषेत त्याला ख्रिसमस असे म्हणतात. येशु ख्रिस्ताचा जन्म जगाचा इतिहासातील सर्वात मोठी ब्राह्मणडनीय घटना होती.
ख्रिसमस उत्सवामध्ये ख्रिसमस 'ट्री'ला खूप महत्त्व असते. त्यामागील एक आख्यायिका देखील सांगितली जाते. त्या दिवशी या झाडाची सजावट कशी सुरू झाली.ख्रिसमसच्या दिवशी सदाहरित वृक्ष सजवून उत्सव साजरा केला जातो. ही परंपरा जर्मनीपासून सुरू झाली. ज्यामध्ये एका आजारी मुलास संतुष्ट करण्यासाठी त्याच्या वडिलांनी सदाहरित वृक्ष सुंदरपणे तयार केला आणि त्याला एक भेट दिली. याशिवाय असेही म्हटले जाते की, जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा सर्व देवतांनी आनंद व्यक्त करण्यासाठी सदाहरित वृक्ष सजविला. तेव्हापासून हे झाड ख्रिसमसच्या झाडाचे प्रतीक मानले गेले आणि ही परंपरा लोकप्रिय झाली.
या दिवसात सांताक्लॉजचे महत्त्व वाढते. बरेच लोक सांता क्लॉजला येशू ख्रिस्ताचा पिता मानतात. तसेच बर्याच कथांनुसार, चौथे शतकात तुर्कस्तानमधील एका शहरात बिशप सेंट निकोलस नावाची व्यक्ती असायची ज्याच्या नंतर सांता क्लॉजची परंपरा सुरू झाली. हे संत गरीब मुलांना भेटवस्तू वाटप करत असत. मुलांमध्ये असा विश्वास आहे की सांता त्यांच्यासाठी भेटवस्तू, चॉकलेट आणि खेळणी वाटप करतो.
या दिवसात सांताक्लॉजचे महत्त्व वाढते. बरेच लोक सांता क्लॉजला येशू ख्रिस्ताचा पिता मानतात. तसेच बर्याच कथांनुसार, चौथे शतकात तुर्कस्तानमधील एका शहरात बिशप सेंट निकोलस नावाची व्यक्ती असायची ज्याच्या नंतर सांता क्लॉजची परंपरा सुरू झाली. हे संत गरीब मुलांना भेटवस्तू वाटप करत असत. मुलांमध्ये असा विश्वास आहे की सांता त्यांच्यासाठी भेटवस्तू, चॉकलेट आणि खेळणी वाटप करतो.
ख्रिसमसला खूप खर्च करून घर सजवलं पाहिजे असं नाही. घरातील टाकाऊ वस्तू तुम्ही सजावटीसाठी वापरू शकता. यासोबतच तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला बनवलेल्या मॉल्सला भेट देण्याची योजनाही बनवू शकता, जे ख्रिसमसच्या वेळी खास पद्धतीने सजवले जातात. नाताळ सण अर्थात ख्रिसमस सोहळा दोन आठवडे सुरू राहतो. या मध्ये ‘पवित्र कुटुंब’, ‘तीन राजांचा सण’ आणि ६ जानेवारी रोजी ‘येशूच्या बाप्तीस्मा’चा सण साजरा होतो.
येत्या 25 डिसेंबरला ख्रिस्ती बांधवांचा हा सण साजरा होणार आहे. ठिकठिकाणी प्रार्थनास्थळे यासाठी सजवण्यात येत आहेत. कोकणात देखील ख्रिस्ती बांधव हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात नाताळचा उत्साह दिसून येतो. तर नवीन वर्षाच मोठ्या जल्लोषात स्वागत देखील केलं जात. यानिमित्त्याने अनेक जण आपल्या आप्तेष्ठांना संदेश पाठवतात तसेच सोशल मिडीयावर पोस्ट आणि स्टेटस शेअर करतात. नाताळ सणातून सामाजिक एकोपा देखील यातून जपला जातो. 'स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची येशूला सौख्य समृध्दी लाभो तुम्हाला' नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा !