मालवण : जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा...श्री गणरायाचे नमन करत मॉरिशस मधील 23 कलाकारांनी सर्वांचीच मने जिंकून घेतली. जवळपास आठ ते नऊ नृत्य, विविध कला सादर करत मराठी भाषेचा जय जयकार मॉरिशसमध्येही कसा घुमतो याची प्रचिती कसाल येथील श्रीदेवी पाव नाई रवळनाथ मंदिरातील सभागृह मध्ये मॉरिशस मधील मराठी बांधवांनी दाखवून दिली.
200 वर्षांपूर्वी या भागातून म्हणजेच महाराष्ट्र कोकण आणि भारतातून विविध प्रांतातून आमचे पूर्वज मॉरिशसमध्ये गेले खरे पण आज आम्ही आमच्या माय भूमीत मातीत येऊन आम्हाला तुमच्यासोबत बागडता आले, रमता आले हे खरंच आमचं भाग्य आहे. यानिमित्ताने कोकण सिंधुदुर्ग आणि मॉरिशस यांच्यातील संबंध आणि नाते अधिक दृढ होण्यास चालना मिळाली आहे अशा भावना व्यक्त केल्या. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गच्यावतीने कसाल येथे रविवारी सायंकाळी मॉरिशस देशातील मराठी प्रेमी बांधवांचा कलाविष्कार कार्यक्रम झाला. मॉरिशस बांधवांचा कलाविष्कार ने सर्वांची मने जिंकून घेतली. पुन्हा पुन्हा या मातीत आणि या कोकणात आम्हाला यावेसे वाटेल आमचा आधारित्य आणि प्रेमभावना आम्हाला कोकण मराठी साहित्य परिषद व कसालवासीयांनी केले हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही सर्वजण मॉरिशसला या असे निमंत्रणही यावेळी या मॉरिशस बांधवांनी दिले. कसाल येथे मॉरिशस येथील कलाकारांचा कलाविष्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने या मॉरिशस मराठी बांधवांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या शुभहस्ते मॉरिशस मराठी सांस्कृतिक विभागाचे चेअरमन अर्जुन पुतलाजी व मॉरिशस मराठी स्पिकिंग युनिटचे अध्यक्ष नितीन बापू जनरल सेक्रेटरी जागतिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक मंच भारत दिलीप ठाणेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के प्रांत प्रतिनिधी ज्येष्ठ लेखिका उषा परब, स्वागत समितीचे अध्यक्ष रुजारियो पिंटो , कुडाळ तालुकाध्यक्ष सौ वृंदा कांबळी, सावंतवाडी तालुका अध्यक्ष अँड संतोष सावंत अँड नकुल पार्सेकर चिराग बांदेकर संदीप वालावलकर सचिन वालावलकर देवस्थान समितीचे यशवंत परब राजन परब अमय परब विनोद परब उत्तम कदम शंकर परब रमाकांत लिंगायत गुरव आधी उपस्थित होते.
यावेळी मॉरिशसमधून मराठी भाषेचा कलाविष्कार आणि मॉरिशस मधील कला सादर करण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर मॉरिशस मधील टीम 14 एप्रिल ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली .महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मॉरिशस मधील टीमचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसाल व मालवण येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी महाराष्ट्रातील पहिला प्रयोग कलाविष्काराचा कसा नेते सादर करण्यात आला. यावेळी मॉरिशस बांधवांनी आपल्या कला सादर करत उपस्थित त्यांची दाद मिळवली. सर्वप्रथम मराठी भाषेत संभाषण करत आम्ही आमच्या पूर्वजांच्या भागात आलो आहोत आमच्या पूर्वजनांचा शोध आम्हाला लागला आहे. आम्ही याच मातीतील असून आम्हाला 200 वर्षानंतर खऱ्या अर्थाने या कसाल गावामध्ये आमचे काहीतरी वेगळे नाते आहे याचा आम्हाला भास होतो आहे अशा शब्दात मॉरिशसचे मराठी सांस्कृतिक विभागाचे चेअरमन अर्जुन पुतलाजी यांनी आपल्या शब्दात भावना व्यक्त केल्या. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने सर्व मॉरिशस मधील मराठी बांधवांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कसाल येथील देवस्थानच्या समितीच्या वतीने ही त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले मॉरिशस आणि भारत देशाचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने मॉरिशस मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन भरवण्यात आले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या मॉरिशस बांधवांची आणि आमची एक सांस्कृतिक साहित्यिक नाते निर्माण झाले आहे. आज ते आपल्या कोकणात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या आजोळी आले आहेत. आपल्या मूळ देशाचे आणि मराठी भाषेचा ते जय जयकार मॉरिशसमध्ये करत आहेत खरोखर कौतुकास्पद आहे असे त्यांनी सातत्याने येथे येत राहावे. यावेळी जेष्ठ लेखिका उषा परब यांनीही आपले विचार मांडले. मॉरिशस मराठी स्पीकिंग ट्रस्टचे अध्यक्ष नितीन बापू व जनरल सेक्रेटरी दिलीप ठाणेकर यांनी मॉरिशस आणि मराठी भाषा कशी तेथे उपक्रम राबवते याची माहिती दिली. यावेळी सर्वप्रथम गणरायाच्या गीताने कलाविष्काराला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जय जय महाराष्ट्र माझा या गीताने तर अक्षरशः उपस्थितितांची मने मॉरिशसच्या टीमने जिंकली. तर त्यानंतर विविध नृत्य कला सादर करत कसालवासीयांना अक्षरशा मराठीचा गजर करायला लावला शेवट मॉरिशस मधील प्रसिद्ध नृत्याने समारोप केला. यावेळी कौशिक हरी सनवी सीताराम प्रियांका सिताराम प्रीती बाई रघु श्रेष्ठ रुगजी रत्नाबाई लक्ष्मण विमलाबाई रूमजी . ऋषी देवजी चव्हाणराव अंबाजी जयश्री बापू हेमा क्रांती पुतलाजी आधी जवळपास 25 जणांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन जिल्हा खजिनदार भरत गावडे व प्रास्ताविक कुडाळ तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष वृंदा कांबळे तर आभार सचिन वालावलकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.