कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फसवलं आहे, तर मनोज जरांगे पाटील यांना मुंबईच्या दिशेने कूच करावी लागली यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शप्पथ खोटी ठरते काय अशी शंका ही आमच्या मनात आता निर्माण होऊ लागली आहे. मात्र आरक्षण देण्याची जबादारी मुख्यमंत्र्यांची व सरकारची आहे असे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांची महा पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असीम सरोदे यांनी मांडलेली बाजू पाहता महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना लोकांमध्ये वाढू लागली आणि याच पार्श्वभूमीवर सुरज चव्हाण आणि आमदार राजन साळवे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई करण्यात आली आहे. आम्ही या कारवाईला भिक घालत नाही अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली.
यापुढे बोलताना आमदार वैभव नाईक यांनी विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या निर्णयावरून लक्ष विचलित व्हावे या हेतूने आमदार राजन साळवी व सुरज चव्हाण यांच्यावर द्वेशा पोटी कारवाई करण्यात आली आहे. ही लढाई आता महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही ही लढाई उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीही राहिलेली नाही ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध गुजरात येथील व्यापाऱ्यांमध्ये राहिली आहे असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
रवींद्र चव्हाण यांना लोकसभेचा तिकीट मिळालं तर त्यांना माझ्या शुभेच्छा !
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्ली येथील भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीच्या उपस्थिती लावल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना मिळणार असल्याची चर्चा रंगत असतानाच आमदार वैभव नाईक यांना पत्रकारांनी या संबंधी विचारणा केली असता आमदार वैभव नाईक यांनी रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या आहेत