मनोज जरांगे पाटील कल्याण दौऱ्यावर..!

Edited by:
Published on: November 13, 2023 13:56 PM
views 108  views

कल्याण : मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील येत्या सोमवारी कल्याणमध्ये येणार आहेत. मराठा समाजाच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांची कोळसेवाडी भागात पोटे मैदानावर जाहीर सभा होणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या कल्याण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांना कल्याणमध्ये आणण्याचे प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करण्याचे जाहीर केले आहे. या दौऱ्याचा भाग म्हणून जरांगे पाटील कल्याणमध्ये येणार आहेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.