सिंधुदुर्ग : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर (भिलार) येथे शनिवारी २९ ऑक्टोबर २०२२ रोजी होत असून कोकण विभागातून मोठ्या संख्येने सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. यानंतर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी जाहीर केली आहे. शनिवारी २९ ऑक्टोबर रोजी साताऱ्यात देशातील पहिले डिजिटल मीडियाचे अधिवेशन होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनंतर रत्नागिरी, रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्षपदी महेंद्र कासेकर, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत घोणसे पाटील, सचिव स्वप्निल घाग, प्रसिध्दी प्रमुख संदेश सप्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अमोल मोरे, जितेश कोळी, सिद्धेश शिगवण, राहुल वर्दे, संतोष कुळे, संदीप बांद्रे, सौ. समिधा बांडागळे यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्षपदी किशोर किर्वे, उपाध्यक्ष नितेश लोखंडे, सचिव संदीप जाबडे, सहसचिव चंद्रहास नगरकर, प्रसिद्धी प्रमुख रुपेश रटाटे यांची तर कार्यकारणी सदस्यपदी नितीन लोखंडे, तुकाराम साळुंखे, समीउल्ला पठाण, अमित जाधव, रेश्मा माने यांची नियुक्ती करण्यात आली.
कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी रत्नागिरी, रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली असून डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाला कोकण विभागातील पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
संस्थापक अध्यक्ष राजा माने, कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर (भिलार) येथे शनिवारी २९ ऑक्टोबर २०२२ रोजी होत असून या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.