महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंजमध्ये यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी

Edited by: विनायक गांवस
Published on: February 01, 2024 06:27 AM
views 212  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग, महाराष्ट्र सरकार, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 'महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंज २०२३'  स्पर्धेचा सिंधुदुर्ग जिल्हास्तरावरील निकाल घोषित करण्यात आला असून यात यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.

कॉलेजचे 19 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यापैकी वंशिता पाटील हिला प्रथम, जेसिका पिंटो हिला द्वितीय आणि तेजस्वी कडू हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सर्व यशस्वी विद्यार्थिनींना जिल्हा मुख्यालयातील ७५ व्या प्रजासत्ताक दिन समारंभात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान आला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, गणेश चिमणकर, जिल्हा समन्वयक कौशल्य विकास, मयुरी परब आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्राचार्य डॉ. विजय जगताप, इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलचे निमंत्रक प्रा.डॉ. प्रशांत माळी, मार्गदर्शक शिक्षक डॉ.रोहन बारसे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.