खाते वाटप जाहीर | पहा कोणाला कोणत खात ?

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: August 15, 2022 12:14 PM
views 192  views

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि गृह खाते देण्यात आले आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खाते दण्यात आले आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता,  दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री, उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रालय, तानाजी सावंत यांना सार्वजनिक आणि कुटुंब कल्याण, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने आणि सांस्कृतीक कार्य, अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषीमंत्री पद देण्यात आलंय.

राधाकृष्ण विखे-पाटील :  महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील  :  उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित  :  आदिवासी विकास

गिरीष महाजन :  ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील :  पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे  :  बंदरे व खनिकर्म

संजय राठोड :  अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे :  कामगार

संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत :  उद्योग

प्रा.तानाजी सावंत  :  सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र  चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार : कृषी

दीपक केसरकर  :शालेय शिक्षण व  मराठी भाषा

अतुल सावे :  सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई  : राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास