राज्यातील माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी महामंडळातर्फे पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 13, 2023 15:16 PM
views 389  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी महामंडळातर्फे पुणे येथील शनिवार वाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालयावर महा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो शिक्षकेतर कर्मचारी राज्यभरातून सहभागी झाले होते. तसेच पुणे जिल्ह्यातील महामार्ग आणि शिक्षण आयुक्त कार्यालयावर जाणारा रस्ता पूर्ण जाम झालेला होता.

 सर्वत्र शिक्षकेतरांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत होती तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

स्वराज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे राज्य अध्यक्ष अनिल माने, सहकार्यवाहक शिवाजी खांडेकर, महामंडळाचे प्रतिनिधी सर्व जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष  अनिल राणे, सचिव गजानन नानचे, ज्येष्ठ सल्लागार काका मांजरेकर, निलेश पारकर, वैभव केंकरे यांच्यासह तमाम शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते.


*शालेय कामकाजावर विपरीत परिणाम -*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी पुणे येथील मोर्चात सहभागी झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये याचा विपरीत परिणाम झाला असल्याचे पहावयास मिळाले.