मुंबई : राज्यात यंदा लम्पी चर्मरोगाचा उद्रेक झाला असून, गोवंशीय जनावरांमधील हा आजार २५ जिल्ह्यांत पसरला आहे. चालू आर्थिक वर्षांत एप्रिलपासून लम्पीने ३८ हजार ६९७ पशुधन बाधित झाले तर ३,२४६ जनावरे दगावली.
राज्यातील दहा जिल्ह्यांमधील जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यात प्रामुख्याने सोलापूर, नगर,
हिंगोली, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्य सरकार लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आतापर्यंत ७० टक्के जनावरांना लस देण्यात आली आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले.