'शिवतीर्था'वर निष्ठावंत तर 'बीकेसी'त नाष्टावंत !

निवृत्त पोलिस अधिकारी संदीप सरवणकर यांची टीका
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 06, 2022 14:21 PM
views 411  views

वैभववाडी : मुंबईत शिवसेनेच्या दोन दस-या मेळाव्यानंतर आता त्यावर दोन्ही गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिंदे गटाने बीकेसीत घेतलेल्या मेळाव्यावर शिवसेना जिल्हा कार्कारणी सदस्य संदीप सरवणकर यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. शिवतीर्थावर निष्ठावंत होते तर बिकेसीवर जमलेली गर्दी नाष्टावंताची होती अशी टीका केली आहे. 

      श्री सरवणकर हे बुधवारी मुंबईत शिवतीर्थावर मेळाव्यासाठी उपस्थित होते. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. सरवणकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,  "शिवतीर्थावर राज्यभरातून निष्ठावंत शिवसैनिक आले होते. या भागातील सर्व रस्ते गर्दीने भरले होते. वाद्यवृंदासह जल्लोषात नाचत येणाऱ्या या मंडळीच्या मनात गद्दारांविरोधात रोष होता. तो त्यांच्या घोषणाबाजीतून दिसत होता.त्यांचा तो उत्साह पाहता  ह्दयापासुन शिवसेनेवर प्रेम करणारे लोकच  हे दिसुन येत होते. त्या उलट बीकेसीला मायाला भुरळवुन आणलेल्या लोकांचीच खोगीर भरती दिसुन आली. १० कोटी पेक्षा जास्त रक्कम भरुन एस.टी तुन वाहतुक व्यवस्था त्यांचे कडुन करण्यात आली होती. एस टी चालकांना कोंबडी व तिर्थाची व्यवस्था सुध्दा केली होती, हे सोशल मिडीया दाखवत होती. तसेच आमदार प्रताप सरनाईकाचे कष्टाचे  मिळकतीतुन अडीच लाख भोजन पँकेटची प्रशांत काँर्नरकडुन  व्यवस्था करणार होते. या सर्व मायाजालात त्या नाष्टावंताना फसवुन खाऊसाठी भाऊगर्दी केली. त्यांना दसर्‍याला नाहीतर दशक्रियेला आल्यासारखी रडतरावाची भाषणे ऐकावी लागली. 

    शिवतिर्थावर सुषमा अंधारे यांच्या भाषणाने,सर्वश्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, रामदास कदम, दिपक केसरकर, तसेच खासकरुन सुष्म व लघु  खात्याचे मंत्री  नारायण राणे व त्यांच्या सुपुत्रांचा खरपुस समाचार घेतला. त्यांनी तो ऐकला असेल, तर  त्यां सर्वांच्या डोळ्यासमोर थोडया वेळाकरिता 'सूक्ष्म अंधारी' आली असेल. तसेच आमदार भास्कर जाधवांनी, नेहमीच्या आपल्या अक्रमक शेैलित केलेल्या भाषणात 'या सर्व ४० डोकी व ५० खोकी  रावणाचा दहन करुनच विजयी मेळावा आपण साजरा करावा, असा उल्लेख करुन' सभा दणकावुन सोडली. पुढे त्यात उध्दव ठाकरे यांनी  गुडघ्यात वाकुन केलेला नमस्कार व बाप पळविण्यावरुन केलेल भाषण सर्व दर्दीना मनाशी भिडल. या मेळाव्यांवरुन एकच सिद्ध झाले, जे ओरीजनल हे ओरीजनल असते. नकली लोकांचा काल पर्दाफाश झाला, असेही ते पत्रकात म्हणतात.