‘मोस्ट व्हायरल बाप्पा’ स्पर्धेचे आज बक्षीस वितरण

'कोकणसाद LIVE'च्या ९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य
Edited by: विनायक गांवस
Published on: March 26, 2023 12:10 PM
views 435  views

सावंतवाडी : दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणचे नंबर १ महाचॅॅनेल 'कोकणसाद LIVE' च्यावतीने गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. मात्र, यावेळी स्पर्धेचे स्वरूप थोडंसे हटके होते. यंदा 'मोस्ट व्हायरल बाप्पा' या थीमने घेण्यात आलेल्या स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळाला. कोकणचे नंबर १ महाचॅॅनेल 'कोकणसाद LIVE' च्या ९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत २६ मार्चला या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. याला उपस्थित राहण्याचे आवाहन टीम कोकणसाद LIVE आणि मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोकणातल्या वाडीवस्तीवरील बाप्पांचे दर्शन जगभरातील कोकणवासीयांना घेता यावे, यासाठी कोकणचे नंबर १ महाचॅनेल कोकणसाद LIVE ने यावर्षी प्रथमच मोस्ट व्हायरल बाप्पा, ही ग्लोबल गणेश स्पर्धा घेतली होती. कोकणात प्रथमच होत असलेल्या अशा प्रकारच्या ग्लोबल स्पर्धेला पहिल्याच वर्षी अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. कोकणातील ही पहिलीच ग्लोबल स्पर्धा ठरली. जगभरातून हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. आकार बिल्डर्स & डेव्हलपर्स, मुख्य प्रायोजक तर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, श्रावणी अगरबत्ती आणि श्रीराम बोअरवेल यांचे सहप्रायोजकत्व याला लाभले होते. कोकणचे नंबर १ महाचॅॅनेल कोकणसाद LIVE च्या २६ मार्चला होणाऱ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत मोस्ट व्हायरल बाप्पा या स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.

यात घाडीगावकर मालवण-ओवळीये यांनी प्रथम क्रमांक, महेंद्र बाबाजी चव्हाण, आदर्शनगर, चौकुळ, सावंतवाडी यांनी दुसरा क्रमांक, सुमीत सत्यवान नाईक, मळेवाड-जकातनाका, नाईकवाडी, सावंतवाडी यांनी तिसरा क्रमांक मिळवला. तर अक्षय दीपक निवळे, कोलगाव-सावंतवाडी, अभिषेक घाडी, धवडकी, माडखोल सावंतवाडी, दुर्गानाथ शिरगावकर, बिबवणे, पळसेवाडी, कुडाळ, सिध्देश श्रीपादराव सुर्वे, खासकीलवाडा, सावंतवाडी, अभय अनिल कदम, सरंबळ, कुडाळ, संतोष अमृत परब, मातोंड,  वरचे बांबर, मिशाळ परिवार, जिल्हा परिषद शाळा नंबर, दोन, उभा बाजार सावंतवाडी, गजानन रत्नोबा कुडतरकर, रतांबेवाडी कणकवली, नवलराज विजयसिंह काळे, सडूरे, सोन धरणे तालुका वैभववाडी, किशोर बजरंग कुबल, तारकर्ली, मालवण  यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावलेत. 

या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. सावंतवाडी येथील राजवाडा येथे रविवारी २६ मार्चला सायंकाळी ६ ते ८ या वेळेत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेय. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन टीम कोकणसाद LIVE आणि मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्यावतीने करण्यात आले आहे.