
रत्नागिरी : राजापूर लांजा साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून, महाराष्ट्रासाठी केलेलं काम, राबविलेल्या योजना यामुळे राज्याच्या जनतेच्या मनात त्यांची एक संवेदनशील नेता अशीच ओळख निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात अशीच महाराष्ट्राची सेवा त्यांच्या कामातून घडेल असा विश्वास किरण सामंत यांनी व्यक्त केला.
यावेळी विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे, आमदार उदय सामंत, आमदा शंभुराज देसाई, आमदार भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रविंद्र फाटक, आमदार योगेश कदम आदि मान्यवर उपस्थित होते.