
सावंतवाडी : राज्याचे पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांची माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे होऊ घातलेल्या ताज ग्रुप हॉटेल प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी व पूर्ण करण्यासाठी सविस्तर चर्चा केली.
तसेच सिंधुदुर्ग जिल्हयात वेंगुर्ला तालुक्यातील निवती समुद्रात निवती रॉक येथे प्रस्तावित सबमरीन पाणबुडी प्रकल्पास चालना देवून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच याबाबत लवकरच बैठक आयोजीत करण्यात येईल. असे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले. इतर प्रस्तावित व होऊ घातलेल्या अन्य पर्यटन प्रकल्पाबाबत चर्चा यावेळी करण्यात आली. त्यासही यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व पर्यटनदृष्या आवश्यक प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत आश्वासित केले.