नवी दिल्ली : मद्याविक्री घोटाळ्याप्रकरणी गेल्या साडेतीन महिन्यांपासून तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. केजरीवाल यांना दीर्घकाळ तुरुंगात डांबून ठेवणे गैर असल्याचे सांगताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठातील एका न्यायमूर्तींनी याबद्दल सीबीआयची कानउघाडणीही केली. न्यायालयाने आदेश प्राप्त होताच शुक्रवारी सायंकाळी केजरीवाल यांची तिहार कारागृहातून सुटका करण्यात आली.