BREAKING | करुळ घाटात अपघात वाहतूक ठप्प !

बंद पडलेल्या ट्रकला 'शिवशाही' धडकली !
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 25, 2022 19:33 PM
views 522  views

वैभववाडी : करुळ घाटात बंद पडलेल्या ट्रकला एसटी धडकली. यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. सायंकाळी ५ वा हा अपघात झाला. सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतूक बंद आहे. अनेक वाहने घाटात अडकली आहेत.

     करुळ घाटातील गगनबावड्यापासून ४ किमी अंतरावर बंद पडलेल्या ट्रकला शिवशाही बस धडकली आहे. दोन्ही वाहने एकमेकांमध्ये अडकली असल्याने हा मार्ग पुर्णतः बंद झाला आहे. अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. सुमारे दोन तास घाटातील वाहतूक ठप्प आहे. अपघाताताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील, श्री तळसकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.