सावंतवाडी : सावंतवाडी येथील रुग्णाला हृदय शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री निधीतून एक लाखाची मदत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली.
सावंतवाडीतील गिरीष विठोबा जाधव यांची आर्थिक स्थिती बेताचीच असून ते खाजगी दुकानात नोकरी करतात. ते आपल्या कामाच्या ठिकाणी असताना त्यांना हृदय विकाराचा त्रास जाणवू लागला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीची वैयक्तिक मदत दिली. त्याशिवाय मुख्यमंत्री निधीतून मदत देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले व त्याचेवर तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली व त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून गिरीष जाधव यांच्यासाठी एक लाखाचा धनादेश बेळगावच्या अरिहंत हॉस्पीटलचे हृदयविकार तज्ञ डॉक्टर एम.डी. दिक्षीत यांच्याकडे पाठविण्यात आला असून गिरिश जाधव यांच्यावर योग्य ते उपचार करुन पुढील कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री निधीतुन मिळालेल्या एक लाखाच्या मदतीमुळे गिरीश जाधव यांच्यावर पुढील उपचार तातडीने करणे सोपे झाले. दीपक केसरकर आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, स्वीय सहाय्यक यांचे जाधव कुटुंबियांनी आभार मानले आहेत.