
नागपूर शहर आणि परिसरात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस सलग तिसऱ्या दिवशीही कायम आहे.नागपूर शहरात पाणीच पाणी झाले आहे . नागपूर जिल्ह्यात हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, खबरदारीसाठी बुधवारी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.