सेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी..!

Edited by:
Published on: October 12, 2023 11:30 AM
views 460  views

शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून १३ ऑक्टोबरऐवजी सुनावणी आज दुपारी २ वाजता होणार आहे. जी - 20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तिकडे जाणार आहेत. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती आहे. पण याच प्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने बदललेल्या वेळापत्रकावर जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे.