जे जे रुग्णालयातील 9 वरिष्ठ डॉक्टांराचे तडकाफडकी राजीनामे

ज्येष्ठ डॉक्टर डॉ. तात्याराव लहाने यांचाही समावेश
Edited by: ब्युरो
Published on: June 01, 2023 12:18 PM
views 415  views

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या जे जे रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जे जे रुग्णालयात विविध पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ज्येष्ठ डॉक्टर डॉ. तात्याराव लहाने यांचादेखील समावेश आहे. डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहित 9 जणांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठातांवर गंभीर आरोप केले आहेत.