कुडाळ : पर्यटनाला चालना देणारा हा लायन्सचा फेस्टिवल आहे. या सेवाभावी संस्थेने हा महोत्सव सर्वप्रथम सुरू केले हे निश्चितच कौतूकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेच्या 'ऑटो-एक्सपो इंडस्ट्रियल-कम-फूड फेस्टिवल' या महोत्सवाला कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर आज सायंकाळी शानदार सुरुवात झाली. गुलाबी थंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल ऑटो एक्स्पो विविध खाद्यसंस्कृतीच्या स्टॉलने या फेस्टिव्हलमध्ये रंगत आली.
सिंधू लायन्स फेस्टिव्हलचा शुभारंभ कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिच्या गणेश वंदनाने झाली. उद्घाटन लायन्स डिस्ट्रिक्ट 3234 D1 चे प्रांतपाल एम के एफ लायन राजशेखर कापसे यांच्या हस्ते, प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी श्रीमती. के. मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सारस्वत को. ऑ. बँक लि. संचालक सीए. सुनील सौदागार कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर लायन्स पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माजी प्रांतपाल सीए अजित पाठक लायन्स अध्यक्ष ऍड समीर कुलकर्णी झोन चेअरमन सीए सागर तेली श्रीनिवास नाईक लायन्स संकुल अध्यक्ष ऍड अमोल सामंत महोत्सव अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट श्रीमती कापसे आनंद बांदिवडेकर संजीव प्रभू काका कुडाळकर नयन बांदेकर डॉ श्रुती सामंत डॉ दीपाली काजरेकर तेजस्विनी वैद्य जीवन बांदेकर अनंत शिंदे अस्मिता बांदेकर मेघा सुकी डॉ चेतना चुबे जी दत्ताराम प्रकाश नेरुरकर स्नेहा नाईक श्रध्दा खानोलकर सीए जयंती कुलकर्णी डॉ अमोघ चुबे शोभा माने ऍड शेखर वैद्य देविका बांदेकर लायन्स पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना लायन्स संकुल अध्यक्ष व जेष्ठ पदाधिकारी ऍड अमोल सामंत म्हणाले, भारतात सर्वप्रथम जाहीर झालेला सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला पर्यटन जिल्हा आहे. येथील संस्कृती खाद्यसंस्कृती यांची ओळख महोत्सव माध्यमातून मिळावी पर्यटनाला अधिक चालना मिळावी या उद्देशाने फेस्टिव्हल सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. गेले दोन वर्षे कोरोना महामारी संकटामुळे कोणतेच कार्यक्रम झाले नाही यावर्षी नवीन वर्षाचे स्वागत सरत्या वर्षाला निरोप या अनुषंगाने सिंधु लायन्स ऑटो एक्स्पो, इंडस्ट्रीयल कम फूड फेस्टिवल 2022 हा 29 ते 31 डिसेंबर या कालावधीत होत आहे. लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग तर्फे प्रथमतः जिल्ह्यात १९९८ साली सुरू करण्यात आली होती. यावर्षीचे आयोजनाचे हे २१ वे वर्ष आहे. सदरच्या महोत्सवामध्ये सर्व नागकिराना ऑटो कंपन्यांच्या गाड्यांच्या वितरकाचे स्टॉल अनुभवण्यास मिळतील व हे ह्या वर्षीच्या महत्वाचे खास आकर्षण आहे. या मध्ये एका छताखाली सर्व ऑटोकंपन्यांच्या गाड्यांचे मॉडेल्स उपलब्ध आहेत . यामुळे गाडी खरेदीसाठी अन्य शहरात जाण्याची गरज भासणार नाही. तसेच या सोबत बँकेद्वारे लोन मेळावा, त्वरित कर्ज व कार एक्सेज सुविधांचे स्टॉलसह जिल्ह्यावासीयांना आपली कार खरेदी एक्सचेंज करण्याची संधी या महोत्सवात मिळणार आहे.
याबरोबरच महोत्सवामध्ये इंडस्ट्रियल व जनरल स्टॉल्स साठी राज्यभरातून विविध प्रकारचे ( हर्बल, आयुर्वेदिक, कॉसमेटिक प्रोडक्ट्स, शेती-घरगुती यंत्र इ.) स्टॉल्स आहेत. या सर्वांसोबतच खवय्यांसाठी मेजवानी म्हणून विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सचे देखील आहेत सिंधुदुर्गसह पुणे मुंबई कोल्हापूर सांगली सातारा येथील इंडस्ट्रियल, ऑटो एक्सपो खाद्यपदार्थ व जनरल स्टॉल्स आदी मिळून 87 स्टॉल सहभागी झाले आहेत आहे .उद्घाटनानंतर हास्यकल्लोळ राज्यस्तरीय विनोदी स्किट स्पर्धा लायन्स गीत नजराणा आदी नावाजलेले कार्यक्रम झाले या महोत्सवात मान्यवरांनी अनेक स्टॉलबरोबरच जी. डी. आर्ट पदवी परिक्षेत दिव्यांगामधून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम आलेल्या पूजा रुपाजी धुरी हिच्या पेटींग स्टॉलची पाहणी केली हा स्टॉल लायन्स क्लब ऑफ कुडाळ यांनी तिला सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून पूर्णतः मोफत स्वरुपात दिलेला आहे. आणि कुडाळ हायस्कूल कुडाळचे 1988 सालचे 10 वी चे काही माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन, "मित्रांगण-एक मैत्रेय स्पंदन" नावाची संख्या स्थापन केली आहे रुपाला या संस्थेने सहकार्य केले आहे सूत्रसंचालन ला स्नेहा नाईक यांनी केले.
आज भारतातील शास्त्रीय, लोक नृत्या सोबत पश्चिमी नृत्य कलेचा आविष्कार कार्यक्रम होणार आहे. तसेच नृत्यासोबत संगीत-गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
ता ३१ रोजी पुणे येथील प्रसिद्ध सिनेतारका लावणीसमाजी अर्चना सावंत व त्यांच्या टीमचा कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील या भव्य लायन्स महोत्सवामध्ये सुमारे ५० हजार लोक भेट देणार आहेत, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.