कणकवली : गणेश चतुर्थीच्या कालावधीत ॲपल कंपनीच्या बहुप्रतीक्षित 15 सीरिजच्या आयफोनचे उद्या 22 सप्टेंबर शुक्रवारी 12 वाजता जागतिक लाँच असून त्याच दिवशी प्रथमच एस. एस. मोबाईल कणकवली मध्ये हा iPhone 15 उपलब्ध होणार आहे. एस.एस.मध्ये पहिल्या भाग्यवान ग्राहकांना त्याच दिवशी हे आयफोन वितरित केले जाणार आहेत.
उद्या होणाऱ्या आयफोन 15 सीरिजच्या फोनची ग्राहकांना आतुरता लागली असून ग्राहकांनी आधीच या फोनचे बुकिंग केले आहे. त्यामुळे ग्राहकांचा मिळतोय उदंड प्रतिसाद मिळत आहे. अॅपलने आयफोन १५ सीरिजचे एकूण ४ मॉडेल्स लाँच केले आहेत. यामध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो, आयफोन १५ प्रो मॅक्स असे मॉडेल्स खास आयफोन प्रेमींसाठी सादर केले आहेत.
या फोन्समध्ये जगातील सर्वात वेगवान A१७ बायोनिक चिपसेट, ६ कोर GPU आणि ३ नॅनो मीटर तंत्रज्ञान, अप्रतिम ५X टेलिफोटो कॅमेरा लेन्ससह ४८ एम.पी. कॅमेरा, टायटॅनियम बॉडीमुळे फोन मजबूत आणि वजनाला हलके, मल्टिटास्किंगसाठी नावीन्यपूर्ण डायनॅमिक आइसलँड फिचर, एकाच यूएसबीसी केबलमुळे मॅकबुक, आयपॅड आणि आयफोन १५ हे सर्व डिव्हाईस चार्जिंग करू शकता, अशी विविध नावीन्यपूर्ण वैशिष्ट्ये दिलेली आहेत. आयफोन १५ च्या सर्व मॉडेल्सच्या खरेदीसाठी एस. एस. मोबाईलमध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात प्री-बुकिंग केलं आहे. त्यामुळे एस. एस. मोबाईल कणकवली येथे आजच भेट देऊन आपला मोबाईल आधीच बुक करा असे आव्हान कणकवली एस एस मोबाईल च्या वतीने करण्यात येत आहे.