सावंतवाडी : बारसु येथील रिफायनरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आवाज सरकार लाठ्या काठ्या घेऊन आबालवृद्धांना महिलांना जखमी करत दाबु पाहत आहेत. सरकारची ही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना बारसु गावातील लोकांसोबत आहे, असं मत शेतकरी संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी व्यक्त केले.
रिफायनरीच्या नादात दोन ते तीन सरकार कोसळीत हे ध्यानात ठेवावे. बारसु गावातील लोकांनी माती परिक्षणाला विरोध करत आंदोलन सुरू केले. परंतु, आंदोलनातील महिला आबालवृद्धांना लाठीचार्ज करून रोखल गेल. त्यामुळे आंदोलन चिघळले आहे. हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना सोबत आहे. शेतकऱ्यांवर हुकुमशाही खपवून घेणार नाही अस मत अण्णा केसरकर यांनी व्यक्त केले.