चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी

जादा भाडे घेणाऱ्यांना बसणार चाप
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 11, 2023 19:58 PM
views 375  views

सिंधुदुर्ग : राज्यातील खासगी प्रवास वाहतुकीचे गणेशोत्सव काळात दाम दुप्पट भाड्या आकारणाऱ्या खासगी वाहन चालक व  ट्रॅव्हल्स कंपन्यांना आरटीओ प्रशासनाने फार मोठा दणका दिला आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग असे साधे, स्लीपर, शिवशाही  याचे दर जाहीर केले असून खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना  यापुढे या दराच्या दीडपट मर्यादितच भाडे आकारता येणार आहे. यापेक्षा जास्त भाडे आकारल्यास प्रवाशांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जाहीर केलेल्या दूरध्वनी व मोबाईल नंबर वर आकारण्यात आलेल्या तिकिटाच्या फोटोसह थेट तक्रार करता येणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.

गणेशोत्सव काळात आरटीओ प्रशासनाने सिंधुदुर्गवासीय चाकरमान्यांसाठी एक गोड बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरण विभागाने ठरवून दिले असून  मुंबई ते सावंतवाडी साधी बस 750 / शिवशाही बस 1115/ तर स्लीपर बस 1105/ असा दर निश्चित करून दिला आहे. या दरानुसार  किंवा या दरापेक्षा दीडपट मर्यादितच आकारू शकतात. त्यामुळे गणेशोत्सव काळात दाम दुप्पट भाडे आकारून प्रवाशांची लूटमार करणाऱ्या  खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना फार मोठी चपराक बसणार आहे.

या दीडपट दरापेक्षा अधिकचे भाडे आकारल्यास  सिंधुदुर्गच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दूरध्वनी तसेच मोबाईल नंबर जाहीर केले आहेत. व अधिकचे भाडे घेणाऱ्या  त्यावेळेस कंपन्या व ट्रॅव्हल्स एजंटा विरोधात वाहनाच्या नंबर सह भाडे तिकिटाचा फोटो काढून खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर तक्रार दाखल करता येणार आहे. दूरध्वनी क्रमांक 02362-229050  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  नंदकुमार काळे मोबाईल नंबर  9822842333 व वरिष्ठ लिपिक  कालिदास झणझणे  9819270209  या मोबाईल क्रमांकावर प्रवाशांना थेट तक्रार दाखल करता येणार आहे.