गोवा सरकारकडून दोडामार्गातील जखमींना 1 लाखाची मदत

लईराई जत्रा चेंगराचेंगरी घटना ; CM सावंतांनी केलं धनादेश प्रदान
Edited by: लवू परब
Published on: June 17, 2025 10:47 AM
views 2987  views

दोडामार्ग :  शिरगांव येथील लईराई देवीच्या जत्रेत चेंजराचेंगरीत जखमी  झालेल्या दोडामार्ग आंबडगाव येथील  सुरेश शंकर गवस, गणपत गवस, शशिकांत गवस यांना गोवा सरकार कडून प्रत्येकी 1 लाखाची मदत देण्यात आली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले. 

गोवा येथील रवींद्र भवन या ठिकाणी आज मंगळवारी हे धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी दोडामार्ग भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, कसई  दोडामार्ग नगरपंचायतचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर आदी उपस्थित होते.