गोव्याचे CM सिंधुदुर्गात

पुण्यभूमी माणगाव दत्त मंदिरमध्ये केली पूजा
Edited by: विनायक गावस
Published on: November 30, 2023 09:28 AM
views 1005  views

सिंधुदुर्ग : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात देव दर्शनासाठी आले आहेत. डॉ. प्रमोद सावंत पुण्यभूमी माणगाव दत्त मंदिर मध्ये विधिवत पूजा करून दत्त चरणी नतमस्तक झाले.

यावेळी त्यांनी विधिवत पूजा करून आरती देखील केली. तर त्यांचे कुलदैवत श्री भवानी माता व श्री देवी भावईचे दर्शन घेण्यासाठी कुणकेरी गावात रवाना झाले आहेत.