सावंतवाडी : वसदेव देवस्थान समिती व ग्रामस्थांच्यावतीने नागसर पेडणे गोवा येथे प्रसिद्ध तबलावादक रोहीदास पारण यांच्या जयगुरू या संगीत संस्थेच्यावतीने गुरुवंदना या कार्यक्रमात सावंतवाडीतील प्रसिद्ध तबलावादक विलास उर्फ (बंड्या) धारगळकर यांना संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल व केलेल्या कामाची दखल घेऊन ज्येष्ठ संगीतप्रेमी महादेव नारायण फडते यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या वर्षीचा त्यांना मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे. बंड्या धारगळकर हे गेली ४० वर्ष संगीत क्षेत्रात काम करीत आहेत