LIVE UPDATES

गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव

विधानसभेत घोषणा
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: July 10, 2025 15:29 PM
views 278  views

मुंबई : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये तर गणेशोत्सवासाठी लगबग सुरु झाली असून, मूर्तीकारही गणेशमूर्ती तयार करण्यात व्यग्र आहेत. तसंच घरच्या गणपतीची मूर्ती निवडण्यासाठी बाजारांमध्ये नागरिकांची लगबग सुरु झाली आहे. यादरम्यान गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे. 

भाजपाचे कसबा पेठचे आमदार नारायण रासने यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना आशिष शेलार यांनी रासने यांचे आभार मानले. पुढे ते म्हणाले, "महाराष्ट्राचा गणेशोत्सव 1893 रोजी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या सुरु केला. घऱोघरी तो सुरु होताच. त्याची एक पार्श्वभूमी सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित होतं आणि त्याच पद्धतीन चालू आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव उत्सव म्हणून घोषित करेल हे मी आजच स्पष्ट करतो".