सावंतवाडी : सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या श्रीदेव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलने विरोधी ठाकरे सेनेच्या सहकार वैभव पॅनलचा १५ -० असा दारुण पराभव करीत एकतर्फी दणदणीत विजय प्राप्त केला. युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.
श्री देव पाटेकर सहकार परिर्वतन पॅनलचे उमेदवार प्रमोद गावडे, आत्माराम गावडे, प्रवीण देसाई, दत्ताराम हरमलकर, प्रभाकर राऊळ, रघुनाथ रेडकर, प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, सोनू गावडे, ज्ञानेश परब, राघोबा राऊळ, आनारोजीन लोबो, रश्मी निर्गुण, सोनू जाधव, नारायण हिराप हे सर्व उमेदवार विजयी झाले. तर दत्ताराम कोळंबेकर हे आधीच बिनविरोध निवडून आले होते. यामुळे भाजपा बाळासाहेबांचे शिवसेना युतीचा हा फार मोठा विजय मानला जात आहे.
संस्था मतदार संघात युतीचे प्रवीण देसाई (२७), आत्माराम गावडे (२७), दत्ताराम हरमलकर(२७), प्रभाकर राऊळ(२६), रघुनाथ रेडकर(२५), प्रमोद सावंत (२६) यांचा विजय झाला. तर व्यक्ती मतदार संघात प्रमोद गावडे (३२५ ), शशिकांत गावडे ( २८६ ), ज्ञानेश परब ( २९६ ) व विनायक राऊळ ( २७८ ) यांचा विजय झाला.
महिला मतदासंघात युतीच्या आनारोजीन लोबो (३२१ ) व रेश्मा निर्गुण (३२० )यांनीही विजय संपादन केला. इतर मागास वर्ग मतदार संघात युतीचे नारायण हिराप (३३२) हे तर अनुसुचित जाती जमाती मतदार संघातही भगवान जाधव (३३९) हे विजयी झाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तर जिल्हा बँक संचालक महेश सारंग, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी व माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती.
निवडणुकीच्या प्रचार शुभारंभावेळीच या निवडणुकीत युतीचे १५ ही उवेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता तो आजच्या विजयाने खरा ठरला.या दैदीप्यमान विजयानंतर भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी भारत माता की जय वंदे मातरम तसेच भाजपा व बाळासाहेबांचे शिवसेना युतीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक तथा भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक रवि मडगांवकर, माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, एकनाथ नाडकर्णी, राजेंद्र म्हापसेकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी सभापती राजू परब, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, मनोज नाईक, आनंद नेवगी, बाळा जाधव यांसह मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, विकी आजगांवकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, संतोष गांवस, कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग, दिलीप भालेकर, बाबा राऊळ, विनोद सावंत, मधु देसाई, जितेंद्र गांवकर, संजय शिरसाट, निळकंठ बुगडे तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे बबन राणे, गजा नाटेकर, सुरेंद्र बांदेकर, ॲङ निता कविटकर, शुभांंगी सुुकी, भारती मोरे, यांसह भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.